Varun Chakaravarthy’s Architect Look Goes Viral : मिस्ट्री स्पिनर अशी ओळख असलेला वरुण चक्रवर्ती सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. तो सध्या आयपीएल खेळतो आहे. मात्र, यादरम्यानच तो आर्किटेक्ट म्हणूनही काम करतो आहे. या संदर्भातील फोटो त्याने नुकताच त्याच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो बघून अनेकांनी त्यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.