

इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत २१ व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स आमने-सामने आहेत. मंगळवारी (८ एप्रिल) ईडन गार्डन्सवर हा सामना खेळवला जात आहे.
या सामन्याचा पहिला डाव मिचेल मार्श, निकोलस पूरन आणि एडेन मार्करम यांनी गाजवला आहे. त्याच्या अफलातून फटकेबाजीमुळे लखनौने कोलकातासमोर २३९ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.