Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals Marathi Update: कोलकाता नाइट रायडर्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मधील आव्हान कायम राखण्यासाठी आज राजस्थान रॉयल्ससमोर तगडे लक्ष्य उभे केले. रहमनुल्लाह गुरबाज व अजिंक्य रहाणे यांनी संघाचा डाव सावरल्यांतर ३७ वर्षीय आंद्रे रसेलने वादळी खेळी केली. त्याने अंगकृष रघुवंशीसह ३३ चेंडूंत ६१ धावा जोडल्या. Andre Russell ने चौकार-षटकारांच्या आतषबाजीच्या जोरावर अवघ्या १० चेंडूंत ५२ धावा कुटल्या आणि KKR ला ४ बाद २०६ धावांपर्यंत पोहोचवले.