
Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals Marathi Update: कोलकाता नाइट रायडर्सच्या आघाडीच्या फलंदाजांना पुन्हा अपयशच आले म्हणावे लागेल. इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये हे वारंवार पाहायला मिळाले. सुनील नरीन व रहमनुल्लाह गुरबाज यांना अपेक्षित सुरुवात करता न आल्याने अजिंक्य रहाणेने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यालाही फार काही करता आले नाही. राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी चांगला मारा करताना KKR ला जखडून ठेवले होते. आंद्रे रसेल व अंगकृष रघुवंशी यांनी शेवटच्या पाच षटकांत वादळी फटकेबाजी करून कोलकाताला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली.