MS Dhoni Leads CSK into Battle Against KKR : आयपीएलमध्ये सर्वाधिक पाच वेळा विजेतेपद पटकावणारा चेन्नई सुपर किंग्सचा संघ आज कोलकाता नाइट रायडर्स संघाशी दोन हात करणार आहे. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात चेन्नईच्या संघाला यंदाच्या मोसमात पाच सामन्यांमधून चार सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. ॠतुराजला दुखापत झाली असल्यामुळे आता उर्वरित मोसमात त्याच्याऐवजी महेंद्रसिंग धोनीकडे चेन्नई संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. चेन्नई संघासाठी ही लढाई अटीतटीची असणार आहे. याप्रसंगी कोलकाता संघाला तिसऱ्या विजयाची संधी आहे.