

IPL 2025 playoff qualification scenario: इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या सातव्या लढतीने गुणतालिकेतील चित्र ३६० अंश कोनाने फिरवले. अव्वल स्थानी असलेला सनरायझर्स हैदराबादचा संघ थेट सहाव्या क्रमांकावर गेला, तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला मोठी लॉटरी लागली. लखनऊ सुपर जायंट्सने काल SRH ला त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभूत करून स्वतःचा फायदा करून घेतला आहे. शार्दूल ठाकूर व निकोलस पूरन यांनी LSG च्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. आयपीएलमध्ये प्रत्येक सामन्याचा निकाल हा अन्य संघांवर फरक पाडतो आणि तेच कालच्या निकालानंतर दिसले...