Lucknow Super Giants vs Gujarat Titans Marathi Update: सलग चार विजयांची नोंद, गुणतालिकेत अव्वल स्थान.. असे असूनही गुजरात टायटन्सचा विजयरथ लखनौ सुपर जायंट्सने रोखला. घरच्या मैदानावर वर्चस्व राखताना LSG ने सहा सामन्यांतील चौथ्या विजयाची नोंद करून Point Table मध्ये उलटफेर केला. ८ गुणांसह अव्वल तीन क्रमांकात दाखल झाले आहेत. निकोलस पूरन ( Nicholas Pooran) व एडन मार्करम यांच्या फटकेबाजीने मैदान दणाणून गेले.