
शुभमन गिलच्या गुजरात टायटन्सने यंदाच्या आयपीएल मोसमात सलग चार सामन्यांमध्ये विजय मिळवताना दिमाखदार कामगिरी केली आहे. आता गुजरात संघासमोर आज (ता. १२) लखनऊ सुपर जायंट्स संघाचे आव्हान असणार आहे.
लखनऊसाठी सर्वाधिक धावा करणारा निकोलस पूरन व गुजरातसाठी प्रभावी गोलंदाजी करणारा मोहम्मद सिराज यांच्यामधील द्वंद्व या लढतीचे आकर्षण असणार आहे.