IPL 2025: CSK ने कोलकाताविरुद्ध फक्त पराभवच स्वीकारला नाही, तर 'हे' तीन लाजिरवाणे विक्रमही झालेत नावावर

CSK unwanted Records: आयपीएल २०२५ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नई सुपर किंग्सला पराभवाचा धक्का दिला. चेन्नईचा हा सलग पाचवा पराभव आहे. यासोबतच चेन्नईच्या नावावर काही नकोसे विक्रम झाले आहेत.
CSK | IPL 2025
CSK | IPL 2025Sakal
Updated on

इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्सला त्यांच्याच घरच्या मैदानात एमए चिदंबरम स्टेडियम (चेपॉक) येथे कोलकाता नाईट रायडर्सकडून पराभवाचा धक्का बसला. कोलकाताने चेन्नईला ८ विकेट्स आणि ५९ चेंडू राखून पराभूत केले.

चेन्नईचा हा यंदाच्या आयपीएल हंगामातील सलग पाचवा पराभव आहे. गेल्या ६ सामन्यांत चेन्नईने सलग ५ पराभव पाहिले आहे. नियमित कर्णधार ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे संघातून बाहेर गेल्यानंतर एमएस धोनी या सामन्यातून नेतृत्व करत होता. मात्र त्याच्याही नेतृत्वात संघाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही.

CSK | IPL 2025
IPL 2025 Play off Scenario: ६ सामन्यांत ५ पराभव! चेन्नई सुपर किंग्सने स्वतःसाठी खणला 'खड्डा'; आता पुढचं गणित कसं असेल?
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com