LSG vs MI Live: दिग्वेश राठी सुधरणार नाही! विकेट घेतल्यावर केली तिच चूक, BCCI यावेळी झापणार नाही तर...

LSG vs MI IPL 2025 Live: आयपीएल २०२५ च्या सामन्यात दिग्वेश राठीने नमन धीरला ४६ धावांवर क्लीन बोल्ड करत मोठी विकेट घेतली. नमन धीर उत्तम फॉर्ममध्ये खेळत असताना राठीने टाकलेला अप्रतिम चेंडू त्याला चकवून गेला आणि स्टंप्स उडाले.
Digvesh Rathi
Digvesh Rathiesakal
Updated on

Lucknow Super Giants vs Mumbai Indians Marathi Update: एकदा कान टोचले किंवा शिक्षा झाली, तर तिच चूक कोण पुन्हा करत नाही. पण, लखनऊ सुपर जायंट्सचा गोलंदाज दिग्वेश राठी ( Digvesh Rathi ) हा सुधरण्याचं नाव घेत नाहीए... मागील सामन्यात चुकीमुळे त्याला बीसीसीआयने त्याची मॅच फी २५ टक्क्यांनी कापली होती आणि १ डिमेरीट गुण दिला होता. शिवाय नोटिसही बजावली होती. त्यानंतरही हा गोलंदाज सुधरत नाही. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात त्याने तिच चूक पुन्हा केली. आता BCCI काय पाऊल उचलते, याची सर्वांना उत्सुकता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com