LSG vs MI Live: मुंबई इंडियन्सचे खेळाडू 'कानफाटे'! Mitchell Marsh साठी अपील करायला विसरले, डग आऊटमध्ये बसून रोहितने चक्र फिरवले अन्...

LSG vs MI IPL 2025 Live: मुंबई इंडियन्सने आजच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. रोहित शर्माला दुखापतीमुळे आजच्या सामन्याला मुकावे लागले. पण, तो डग आऊटमध्ये बसून मदतीला धावला.
Mitchell Marsh
Mitchell Marsh esakal
Updated on

Lucknow Super Giants vs Mumbai Indians Marathi Update: मुंबई इंडियन्स इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध 'कानफाटे' ठरले. स्फोटक फलंदाज मिचेल मार्श पहिल्याच चेंडूवर बाद झाला असता, परंतु एकानेही अपिल केले नाही आणि त्याने ३१ चेंडूंत ६० धावांची आक्रमक खेळी केली. १२९२ दिवसानंतर आयपीएल सामना न खेळणाऱ्या रोहित शर्मानेच संघाला मदत केली आणि डग आऊटमध्ये बसून चक्र फिरवली. तेव्हा कुठे मिचेल मार्शची विकेट मिळाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com