Lucknow Super Giants vs Mumbai Indians Marathi Update: मुंबई इंडियन्सने आजच्या संघात आणखी एक बदल करताना युवा खेळाडूला पदार्पणाची संधी दिली आहे. आजच्या सामन्यातून राज अंगद बावा ( Raj Angad Bawa ) याला मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२५ संघातून पदार्पणाची संधी दिली आहे. राज हा चंदीगडचा एक आश्वासक वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू आहे आणइ तो २०२२ मध्ये १९ वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारताच्या संघाचा भाग होता. अंतिम सामन्यात त्याने इंग्लंडविरुद्ध ५ बळी घेतले आणि सामनावीराचा पुरस्कार जिंकला होता.