

Lucknow Super Giants vs Mumbai Indians Marathi Update: रोहित शर्मा आजचा सामना खेळत नसला तरी त्याने डग आऊटमध्ये बसून चक्र फिरवलेली पाहायला मिळाली. मिचेल मार्श मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची बेक्कार धुलाई करत होता आणि स्ट्रॅटेजी टाईममध्ये रोहित मैदानवार येऊन गोलंदाजांना टीप्स देऊन गेला. त्यानंतर सामन्याचे चित्र बदलेल अन् लखनऊ सुपर जायंट्सच्या धावगतीला लगाम लागली. त्यांच्या धावांचा वेग मंदावण्यात मुंबईच्या गोलंदाजांना यश आले. Hardik Pandya ने पाच विकेट्स घेतल्या.