IPL 2025 Lucknow Super Giants vs Sunrisers Hyderabad : इंडियन प्रीमिअर लीगच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू रिषभ पंत ( Rishabh Pant) पुन्हा एकदा अपयशी ठरला. लखनौ सुपर जायंट्सच्या संघाने सुरुवात चांगली केली होती आणि त्यांना प्ले ऑफमध्ये राहण्यासाठी आता प्रत्येक मॅच जिंकणे आवश्यक होते. पण, तरीही सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांसमोर रिषभ अपयशी ठरला. ईशान मलिंगाने अविश्वसनीय झेल घेत रिषभला ७ धावेवर माघारी पाठवले. रिषभचं अपयश पाहून LSG चे मालक संजीव गोएंका ( Sanjiv Goenka ) संतापलेले दिसले.