
IPL 2025 Lucknow Super Giants vs Sunrisers Hyderabad : इंडियन प्रीमिअर लीग २०२५मधील प्ले ऑफच्या चौथ्या जागेसाठी लखनौ सुपर जायंट्स शर्यतीत आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या लढतीत त्यांना प्रथम फलंदाजीला यावे लागणार आहे. LSG ला स्पर्धेत राहायचे असेल तर उर्वरित तिन्ही सामने जिंकावे लागतील. लखनौने पहिल्या पॉवर प्लेमध्ये ६९ धावा चोपल्या, परंतु त्यांचे दोन्ही सलामीवीर पहिल्या चार षटकांतच माघारी परतले असते आणि पदार्पणवीर हर्ष दुबेला ( Harsh Dubey) या विकेट मिळाल्या असत्या. पण, यष्टिरक्षक इशान किशनकडून चूका झाल्या.