
भारत-पाकिस्तान यांच्यातलं युद्ध थांबलं असलं तरी मागील ४-५ दिवसांत जे घडलं ते पाहून इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये सहभागी झालेल्या परदेशी खेळाडूंमध्ये आजही भीती कायम आहे. बीसीसीआयने येत्या १-२ दिवसांत सुधारित वेळापत्रक जाहीर करण्याची शक्यता आहे, परंतु त्यात परदेशी खेळाडूंच्या सहभागावर अजूनही प्रश्न आहेच. युद्धामुळे बरेच परदेशी खेळाडू व भारतीय खेळाडूही आपापल्या घरी परतले. त्यांना पुन्हा बोलवण्यापासून ते वेळापत्रकाचे पुढील नियोजन व ठिकाण इथपर्यंतची तयारी बीसीसीआयला करायची आहे.