Who will win today’s IPL match between GT and PBKS? :आयपीएलमध्ये आज गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात सामना होणार आहे. दोन्ही संघांचा हा पहिलाच सामना आहे. यंदा शुबमन गिल गुजरात टायटन्सचं नेतृत्व करणार आहे, तर तर पंजाब किंग्जची धुरा श्रेयस अय्यरच्या खांद्यावर असणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार असून पहिल्याच सामन्यात विजयी सलामी देण्याचा दोन्ही संघाचा प्रयत्न असणार आहे.