IPL 2025 Mumbai Indians beat Gujarat Titans Marathi Update : मुंबई इंडियन्सने दोनशेपार धावा केल्यानंतर एकही सामना गमावलेला नाही आणि तेच आजही झाले. आयपीएल २०२५ च्या एलिमिनेटर लढतीत २२८ धावांचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सने कडवी टक्कर दिली होती. पण, ते २० धावांनी कमी पडले आणि मुंबईने बाजी मारली. साई सुदर्शन व वॉशिंग्टन सुंदर मैदानावर असेपर्यंत सामना गुजरातच्या पारड्यात होता, परंतु कर्णधार हार्दिक पांड्याने हुकमी एक्का काढला अन् मॅच फिरली...