Mumbai Indians vs Chennai Super Kings Marathi Update: १७ वर्षीय आयुष म्हात्रे आणि शिवम दुबे या मुळच्या मुंबईच्याच खेळाडूंनी मुंबई इंडियन्सला ईंगा दाखवला. पदार्पणाच्या सामन्यात आयुषने ३२ धावांची वादळी खेळी केल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सला दुबेने मोठी धावसंख्या उभारून दिली. रवींद्र जडेजानेही उपयुक्त खेळी केली. MS Dhoni फक्त ४ धावा करून माघारी परतल्याने चाहते निराश झाले.