Mumbai Indians vs Chennai Super Kings Marathi Update: मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्माला आजही इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळवणार आहेत. चेन्नईने १७ वर्षीय आयुष म्हात्रेला पदार्पणाची संधी दिली आहे आणि प्लेइंग इलेव्हनमधून राहुल त्रिपाठीला बाहेर बसावे लागले आहे. काल राजस्थान रॉयल्सच्या १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या फटकेबाजीनंतर आज सर्वांचे लक्ष आयुषच्या फलंदाजीकडे लागले होते. रचिन रवींद्र ( ५) माघारी परतल्यानंतर चौथ्या षटकात फलंदाजीला आलेल्या आयुषने तुफान फटकेबाजी केली.