IPL 2025 MI vs GT : शुभमन गिल विरुद्ध हार्दिक पंड्या, दोघांचीही प्रतिष्ठा पणास; एलिमिनेटर सामन्यात आज मुंबई-गुजरात आमनेसामने

MI vs GT IPL 2025 Eliminator : यंदाच्या मोसमात मुंबईविरुद्ध झालेले दोन्ही साखळी सामने जिंकलेले असल्यामुळे गुजरातचे पारडे जड असेल, मात्र गेल्या दोन साखळी सामन्यांतील पराभव त्यांची चिंता वाढवणाराही आहे.
MI vs GT IPL 2025 Eliminator
MI vs GT IPL 2025 Eliminatoresakal
Updated on

Shubman Gill vs Hardik Pandya in IPL 2025 Eliminator between Gujarat Titans and Mumbai Indians : मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स या दोन्ही माजी विजेत्यांपैकी यंदाच्या आयपीएलमध्ये एकाचा प्रवास पुढे सुरू राहणार आहे, तर एकाचा प्रवास संपणार आहे. हे दोन्ही संघ आपापल्या अखेरच्या साखळी सामन्यांत पराभूत झालेले आहेत. त्यामुळे विजयी मार्गावर परत येणारा संघ क्वॉलिफायर-२ सामन्यासाठी पात्र ठरणार आहे.

यंदाच्या मोसमात मुंबईविरुद्ध झालेले दोन्ही साखळी सामने जिंकलेले असल्यामुळे गुजरातचे पारडे जड असेल, मात्र गेल्या दोन साखळी सामन्यांतील पराभव त्यांची चिंता वाढवणाराही आहे. एकूणच दोन्ही संघांचे कर्णधार शुभमन गिल आणि हार्दिक पंड्या यांची प्रतिष्ठा पणास लागणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com