Mumbai Indians today match preview : प्रत्येकी १४ गुण मिळवत आयपीएलच्या प्ले ऑफध्ये स्थान मिळण्यासाठी दावेदार असलेल्या मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात आज सामना होत आहे. तुल्यबळ असलेल्या या संघांमधील लढत संघर्षमय होईल, अशी अपेक्षा आहे.
मुंबई इंडियन्सचा संघ सध्या तिसऱ्या स्थानावर आहे आणि त्यांची निव्वळ सरासरी इतर सर्व संघांच्या तुलनेत फारच चांगली आहे. मुंबईचे एकूण तीन सामने शिल्लक आहेत. यातील दोन सामने जिंकले तरी त्यांना प्लेऑफमध्ये थेट प्रवेश मिळवणार आहे, परंतु उद्या वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या लढतीतील प्रतिस्पर्धी गुजरातला हरवणे तेवढेसे सोपेही नसेल.