Rishabh Pant's hilarious moment as translator for Digvesh Rathi during MI vs LSG goes viral : आयपीएलमध्ये शुक्रवारी झालेल्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सचा 12 धावांनी पराभव केला. या विजयात लखनऊचा फिरकी गोलंदाज दिग्वेश राठीने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने 4 षटकांत 21 धावा देत 1 विकेट घेतली आणि या कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. विशेष म्हणजे, या सामन्यात रिषभ पंत त्याच्या मदतीला धावून आला.