IPL 2025 MI vs PKBS : मुंबईला पहिल्या स्थानाची संधी; श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्सविरुद्ध आज जयपूरमध्ये सामना
Mumbai vs Punjab final league match 2025 : गुजरात पराभूत झाल्यामुळे मुंबईला पहिला क्रमांक मिळवण्याची संधी आहे. गुजरात, बंगळूर, मुंबई आणि पंजाब या चार संघांनी प्लेऑफमध्ये प्रवेश निश्चित केला आहे.
Mumbai Indians vs Punjab Kings : बाद फेरी निश्चित झाल्यानंतर मुंबई इंडियन्सचे लक्ष आता पहिल्या दोन क्रमांकात स्थान मिळवण्याचे आहे. पंजाब संघही याच उद्देशाने आज मैदानात उतरणार आहे. आयपीएलमध्ये आज हे दोन्ही संघ आपापले अखेरचे साखळी सामने खेळतील.