MI vs Punjab IPL 2025 turning point Nehal Vadhera dropped catch : रविवारी झालेल्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात पंजाबने मुंबईचा पाच विकेट्सने दणदणीत पराभव केला आहे. या सामन्यात मुंबईने पंजाबसमोर २०४ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. पण पंजाबने हे लक्ष्य १९ षटकातच ५ विकेट्स गमावत पूर्ण केलं. या सामन्यात कर्णधार श्रेयस अय्यरने ४१ चेंडूत ८७ धावांची कर्णधाराला साजेशी खेळी केली. तर नेहल वढेराने २९ चेंडूत ४८ धावा करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.