

चेन्नई सुपर किंग्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये सलग पाच पराभवानंतर अखेर काल विजयाची चव चाखली. लखनौ सुपर जायंट्सविरुद्धचा सामना CSK ने ५ विकेट्स व ३ चेंडू राखून जिंकला. LSG च्या ७ बाद १६६ धावांच्या प्रत्युत्तरात CSK ने १९.३ षटकांत ५ बाद १६८ धावा केल्या. ११ चेंडूंत नाबाद २६ धावा करणाऱ्या महेंद्रसिंग धोनीला मॅन ऑफ दी मॅच पुरस्काराने गौरविण्यात आले. या सामन्यात MS Dhoni ने एक अविश्वसनीय रन आऊट केला आणि सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा रंगली. पण, CSK च्या माजी सहकाऱ्याने हा तुक्का असल्याचे विधान केले अन् आता नेटिझन्स त्याचा समाचार घेत आहेत.