MUMBAI INDIANS QUALIFIED INTO THE QUALIFIER 2
मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या क्वालिफायर २ मधील जागा पक्की केली. गुजरात टायटन्सविरुद्धच्या एलिमिनेटर लढतीत मुंबईने रोमहर्षक विजय मिळवला. नाणेफेक जिंकून हार्दिक पांड्याने प्रथम फलंदाजीचा धाडसी निर्णय घेतला आणि रोहित शर्मा, जॉनी बेअरस्टो, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा व हार्दिक यांनी तो योग्य ठरवला. मुंबईच्या २२८ धावांचा पाठलाग करताना गुजरातकडून कडवी टक्कर पाहायला मिळाली. साई सुदर्शन, वॉशिंग्टन सुंदर यांनी MI चे टेंशन वाढवले होते. पण, जसप्रीत बुमराहने ( JASPRIT BUMRAH) ने ही जोडी तोडून मॅच फिरवली. मुंबईला आता क्वालिफायर २ मध्ये पंजाब किंग्सचा सामना करायचा आहे. १ जूनला अहमदाबाद येथे हा सामना होईल.