IPL 2025 Mumbai Indians vs Delhi Capitals Marathi Update: मुंबई इंडियन्सने अखेर इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या प्ले ऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध झालेल्या महत्त्वाच्या सामन्यात मुंबईने जबरदस्त खेळ करत विजय मिळवला आणि त्याचबरोबर अंतिम चार संघांच्या यादीत आपलं नाव नोंदवलं. पराभवामुळे दिल्ली कॅपिटल्सचं आयपीएल २०२५ मधील आव्हान संपुष्टात आलं आहे. सूर्यकुमार यादव आजच्या सामन्यातील नायक ठरला. त्याच्या नाबाद ७३ धावांनी संघाला मोठं लक्ष्य उभं करून दिलं आणि तिथेच दिल्लीची हार निश्चित झाली होती. त्यानंतर जसप्रीत बुमराह, मिचेल सँटनर या गोलंदाजांनी आपला करिष्मा दाखवला.