Hardik Pandya and Shreyas Iyer to lead Mumbai Indians and Punjab Kings in IPL 2025 Qualifier 2 in Ahmedabad : रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता त्यांच्यासमोर कोणत्या संघाचे आव्हान असेल, याचे उत्तर आज अहमदाबादमध्ये मिळेल. आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील क्वालिफायर २ चा सामना मुंबई इंडियन्स-पंजाब किंग्स यांच्यामध्ये रंगणार आहे. या लढतीतील विजेता अंतिम फेरीत पोहोचेल व बंगळूर संघाचा सामना करेल; मात्र पराभूत संघाचे आव्हान तिथेच संपुष्टात येईल.