Nita Ambani reactions after MI loss vs PBKS in IPL 2025 Qualifier 2
इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या पहिल्या सहापैकी पाच सामन्यांत पराभव पत्करूनही मुंबई इंडियन्सचा संघ क्वालिफायर २ पर्यंत पोहोचला. त्यांची ही भरारी पाहून यंदाचे जेतेपद तेच पटकावतील असे वाटू लागले होते. संघ मालकिण नीता अंबानी यांनी काही दिवसांपूर्वी सहावं जेतेपद लोड होतंय, असा इशारा दिला होता. पण, आज त्याच नीता अंबनी यांच्यावर डोक्यावर हात लावून बसण्याची वेळ आली. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पंजाब किंग्सने क्वालिफायर २ मध्ये मुंबईचा ५ विकेट्स व ६ चेंडू राखून पराभव केला आणि अंतिम फेरीत धडक दिली. आयपीएल २०२५ ची जेतेपदाची लढत आता पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघांमध्ये होणार आहे.