Who is leading Orange Cap IPL : आयपीएलमध्ये गुरुवारी झालेल्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सने गुजरात टायटन्सचा 33 धावांनी पराभव केला आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात एलएसजीने प्रथम फलंदाजी करताना २ बाद २३५ धावांचा डोंगर उभारला होता. मात्र, गुजरातला २०२ धावांपर्यंतच मजल मारता आली. या सामन्यात मिशेल मार्शने ६४ चेंडूत ११७ धावांची धमाकेदार खेळी केली. तर निकोलस पूरनने २७ चेंडूत ५६ धावा करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.