Shreyas Iyer abuses teammate after PBKS vs MI match : पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने खणखणीत षटकार मारून मुंबई इंडियन्सचा पराभव निश्चित केला. इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या फायनलमध्ये प्रवेश केल्यानंतरही श्रेयसने कोणताच जल्लोष केला नाही. त्याने हेल्मेट काढलं, सहकाऱ्याला मिठी मारली अन् नंतर मुंबई इंडियन्सच्या सर्व खेळाडूंसह हस्तांदोलन केलं. श्रेयसच्या या शांत स्वभावाचे कौतुक होत असताना एक Video Viral झाला आहे. ज्यात तो सहकाऱ्यावर संतापलेला दिसतोय आणि त्याच्या ओठांच्या हालचालीवरून त्याने शिवी दिल्याचा अंदाज बांधला जात आहे.