
IPL 2025 Punjab Kings vs Kolkata Knight Riders Marathi update : पंजाब किंग्स आज त्यांच्या घरच्या मैदानावर मागील सामन्यातील अपयश विसरण्याच्या प्रयत्नात उतरला खरा, परंतु नाणेफेकी जिंकल्यानंतर घेतलेल्या निर्णयामुळे त्यांचा आत्मविश्वास खचलेलाच दिसला. फलंदाजीसाठी आव्हानात्मक खेळपट्टीवर कर्णधार श्रेयस अय्यरने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. आम्ही दोन सामने हे प्रथम फलंदाजी केल्यानंतरच जिंकले, असा तर्क त्यामागे होता. पण, आज त्याचा निर्णय संघाला घेऊन बुडाला. मालकीण प्रीति झिंटाही ( Preity Zinta ) नाराज दिसली.