PBKS vs KKR Live : श्रेयस अय्यरचा अजब तर्क, पंजाबने नाणेफेक जिंकली पण, घडलं अजिंक्यच्या मनासारखं; मार्कस स्टॉयनिसला बाकावर बसवलं

IPL 2025 PBKS vs KKR Marathi News : पंजाब किंग्स आणि कोलकाता नाइट रायरडर्स यांच्या लढतीच्या निमित्ताने मुंबईकर एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. श्रेयस अय्यर विरुद्ध अजिंक्य रहाणे, असा हा सामना रंगणार आहे.
PBKS vs KKR
PBKS vs KKResakal
Updated on

IPL 2025 Punjab Kings vs Kolkata Knight Riders Marathi update : इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये आता विजयासह नेट रन रेटची शर्यत सुरू होणार आहे. चार संघांच्या खात्यात प्रत्येकी ८, दोघांच्या खात्यात प्रत्येकी ६ आणि उर्वरित चार संघांची प्रत्येकी ४ गुणसंख्या दिसतेय. गुणतालिकेत प्रत्येकी सहा गुण असलेले पंजाब किंग्स व कोलकाता नाइट रायडर्स हे संघ समोरासमोर आले आहेत. यात जो विजय मिळवेल तो संघ ८ गुण असलेल्या संघांच्या पंक्तित जाईल. कोलकाताने ( ६) पंजाबपेक्षा एक सामना जास्त खेळला आहे आणि आज ते घरच्या मैदानावर विजयासाठी प्रयत्नशील असतीलच.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com