
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत रविवारी (४ मे) पंजाब किंग्सने लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध ३७ धावांनी विजय मिळवला. धरमशाला येथे झालेल्या या सामन्यात विजय मिळवल्याने पंजाब किंग्सला दोन महत्त्वाचे पाँइंट्स मिळाले आहे. पंजाब किंग्सचा हा ११ सामन्यांतील ७ वा विजय आहे. तसेच लखनौचा मात्र ११ सामन्यांतील ५ वा पराभव आहे.
या सामन्यात पंजाब किंग्सने लखनौ सुपर जायंट्ससमोर २३७ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौला २० षटकात ७ बाद १९९ धावा करता आल्या. लखनौसाठी आयुष बडोनीने अर्धशतक करत चांगली झुंज दिली. पण त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही. अर्शदीप सिंगने पंजाब किंग्ससाठी शानदार गोलंदाजी केली.