Viral moment: Akash Ambani tries to talk to Shreyas Iyer during IPL match : पंजाब किंग्सने २०१४ नंतर प्रथमच क्वालिफायर १ मधील आपले स्थान पक्के केले आहे. इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये पंजाबने त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभूत केले. ७ विकेट्सने विजय मिळवून १९ गुणांसह पंजाब किंग्स गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला आणि आता त्यांना क्वालिफायर १ खेळण्याची संधी मिळाली. दरम्यान, या सामन्यात एक क्षण सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. सामना सुरू असताना पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यर सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत होता आणि तेव्हा सीमारेषेबाहेर सोफ्यावर बसलेले मुंबई इंडियन्सचे मालक आकाश अंबानी त्याच्यासोबत चर्चा करण्याच्या प्रयत्नात दिसले.