unjab Kings preparing for playoff-deciding clash in Jaipur : आव्हान संपलेल्या राजस्थानवर विजय मिळवून स्वतःसाठी प्लेऑफ निश्चित करण्याची संधी पंजाब किंग्सला मिळणार आहे. आज दुपारी या दोन संघांत सामना होत आहे. ८ मे रोजी धरमशाला येथे दिल्ली संघाविरुद्ध सामना खेळत असताना सीमेपलीकडून हल्ला होत असल्यामुळे पंजाबचा तो सामना थांबवण्यात आला होता. त्या ब्रेकनंतर पंजाबचा संघ पुन्हा एकदा यंदाच्या आयपीएलमध्ये आपले वर्चस्व दाखवण्यास सज्ज होत आहे.