IPL 2025 latest injury and replacement news
इंडियन प्रीमिअर लीग २०२५ एका आठवड्याच्या विश्रांतीनंतर १७ मे पासून पुन्हा सुरू होणार आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्या लढतीने लीग पुन्हा सुरु होणार आहे. भारत-पाकिस्तान यांच्यातल्या वाढलेल्या तणावामुळे ही लीग आठवड्यासाठी स्थगित केली गेली होती. त्यामुळे परदेशी व भारताचे खेळाडू आपापल्या घरी गेले होते. लीगचं सुधारित वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर परदेशी खेळाडूंना परत बोलावण्याचे आव्हान फ्रँचायझींना पेलावे लागतेय.