IPL 2025 playoff scenario 5th consecutive defeated for CSK : महेंद्रसिंग धोनी कर्णधारपदावर परतल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सचे नशीब बदलेल, हा भ्रम होता. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली खेळताना चेन्नईने आयपीएल २०२५ मघ्ये चार सामन्यांत एक विजय मिळवला आणि तोही पहिचा सामना चेपॉकवर. त्यानंतर चेन्नईची गाडी घसरलेलीच आहे. आज कोलकाता नाइट रायडर्सने त्यांना घरात घुसून लोळवले. त्यामुळे MS Dhoni च्या येण्याने परिस्थिती काही बदलली नाही. KKR ने ८ विकेट्स ५९ चेंडू राखून विजय मिळवला. कोलकाताने १०.१ षटकांत २ बाद १०७ धावा करून मॅच जिंकली.