IPL 2025 playoff race heats up! इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या ७४ पैकी ३९ लढती पूर्ण झाल्या आहेत. १० संघांचा समावेश असलेल्या या लीगमध्ये प्ले ऑफच्या शर्यतीत स्थान पक्कं करण्यासाठी संघाल १८ ते २० गुण मिळवणे गरजेचे आहे. १६ व १४ असे गुण मिळवणाराही संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरू शकतो, परंतु त्यासाठी अंकांची खूप डोकेफोड करावी लागेल. अशा परिस्थितीत नेट रन रेट महत्त्वाची भूमिका बजावणारा ठरू शकतो. त्यामुळे सध्या गुजरात टायटन्स १२ गुण मिळवून अव्वल स्थानावर असला, तरी ते प्ले ऑफसाठी पात्र ठरतीलच, याची खात्री आता देता येणार नाही. त्यात प्रत्येकी ४ गुण असलेले राजस्थान रॉयल्स, चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद हेही अद्याप तांत्रिकदृष्ट्या या शर्यतीतून बाहेर फेकले गेलेले नाहीत.