Which team will qualify between Mumbai and Delhi in IPL 2025 : आयपीएल २०२५ मधील साखळी सामने आता जवळपास संपुष्टात आलं आहेत. लवकरच प्लेऑफच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे प्लेऑफसाठी तीन संघ निश्चित झाले आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज या संघांनी त्यांचा प्लेऑफमधील प्रवेश निश्चित केला आहे.
मात्र, चौथ्या स्थानावर कोणता संघ असणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. यासाठी दिल्ली आणि मुंबई यांच्यात चुरशीची लढत बघायला मिळते आहे. दरम्यान, दोन्ही संघासाठी प्लेऑफसाठीचं समीकरण कसं आहे? जाणून घेऊया.