IPL 2025 Delhi Capitals vs Punjab Kings Marathi News: दिल्ली कॅपिटल्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२५ च्या शेवटच्या साखळी सामन्यात पंजाब किंग्सवर विजय मिळवला. या विजयामुळे क्वालिफायर १ व एलिमिनेटरचे गणित आणखी चुरशीचे झाले आहे. अजूनही क्वालिफायर १ मध्ये कोणते संघ खेळतील हे ठरू शकलेले नाही. पंजाब किंग्सने ही मॅच जिंकली असती तर ते १९ गुणांसह टेबल टॉपर झाले असते. आता त्यांना क्वालिफायर १ साठी शेवटच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव करावा लागणार आहे.