Rajasthan Royals face serious match-fixing allegations: राजस्थान रॉयल्ससंघावर पुन्हा एकदा मॅच फिक्सींगचा आरोप होतो आहे. राजस्थान क्रिकेट असोशिएशनचे संजोजक जयदीप बिहाणी यांनी हे आरोप केले आहेत. लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात राजस्थानच्या खेळाडूंकडून मॅच फिक्सिंग झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच याप्रकरणी चौकशी करण्याची मागणीही बिहाणी यांनी केली आहे. या आरोपांनंतर राजस्थान रॉयल्स पुन्हा वादात अडकण्याची शक्यता आहे.