Rajasthan Royals vs Chennai Super Kings Match Preview : गुवाहाटी ( पीटीआय) : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरकडून शुक्रवारी एकतर्फी पराभव झाल्यामुळे आत्मविश्वास कमजोर झालेल्या चेन्नई सुपर किंग्जचा अजूनही चाचपडत असलेल्या राजस्थान रॉयल्सविरुद्ध सामना होत आहे.
दोन सामन्यांतून एक विजय, एक पराभव अशी चेन्नईची कामगिरी आहे तर राजस्थानने दोन्ही सामने गमावलेले आहे. चेन्नईचा संघ आपली गाडी रुळावर आणतात की राजस्थान पहिला विजय मिळवतात याची उत्सुकता आहे; पण दोन्ही संघ सध्या बॅकफूटवरच आहेत.