
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सला शनिवारी (३ मे) नवव्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने घरच्या मैदानात एम चिन्नास्वामी स्टेडियमवर अवघ्या २ धावांनी विजय मिळवला. त्यामुळे बंगळुरूने या हंगामातील ८ वा विजय मिळवला.
यासह त्यांनी १६ गुणांसह पाँइंट्स टेबलमध्ये अव्वल क्रमांक मिळवला आहे. १६ गुण मिळवणारा हा पहिला संघ ठरला असून प्लेऑफमध्येही जवळपास स्थान पक्के केले आहे.