RCB vs PBKS IPL Final Live: अखेर तो दिवस उजाडलाच! बंगळुरूने पंजाबला हरवत पहिली ट्रॉफी जिंकली
RCB vs PBKS Final Match Live Cricket Score Updates: आज आयपीएल २०२५ स्पर्धेचा अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्स संघात झाला. या सामन्यानंतर आयपीएलला बंगळुरूच्या रुपात नवा विजेता मिळाला.
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेचे विजेतेपद जिंकून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने इतिहास घडवला आहे. बंगळुरू आयपीएलचे आठवे आणि नवे विजेते ठरले. अंतिम सामन्यात पंजाब किंग्सला ६ धावांनी पराभूत करत बंगळुरूने पहिल्या विजेतेपदाला गवसणी घातली.