
गुरुवारी (२४ एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने राजस्थान रॉयल्सला इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत ११ धावांनी पराभूत केले. हा सामना बंगळुरुच्या घरच्या मैदानात एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झाला होता.
बंगळुरचा आयपीएल २०२५ हंगामातील घरच्या मैदानातील हा पहिलाच विजय ठरला आहे. मात्र या सामन्यात मैदानावरील पंच उल्हास गंधे यांच्याकडून मोठी चूक झाल्याचे दिसले. ते एक निकाल देताना गोंधळलेले दिसले.