
इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत शुक्रवारी (२३ मे) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात होत आहे. लखनौमधील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियममध्ये होत असलेल्या या सामन्यात बंगळुरू पहिल्या क्रमांकावर येण्यासाठी, तर हैदराबाद प्रतिष्ठेसाठी खेळत आहे.
या सामन्यात हैदराबादसाठी इशान किशनने शानदार खेळ केला, पण त्याचे शतक थोडक्यात हुकले. पण त्याच्या खेळीच्या मदतीने हैदराबादने बंगळुरूसमोर २३२ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले आहे.