BCCI announces fresh IPL 2025 schedule after temporary suspension due to India-Pakistan tension : आठवड्यापूर्वी स्थगित करण्यात आलेली इंडियन प्रीमियर लीग स्पर्धा आजपासून पुन्हा सुरु होणार आहे. त्यासाठी बीसीसीआयकडून नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. त्यानुसार आज बंगळुरु विरुद्ध कोलताना यांच्यात सामना होणार आहे. तसेच भारत पाकिस्तान तणावामुळे रद्द झालेला दिल्ली विरुद्ध पंजाब सामनाही ८ मे रोजी पुन्हा खेळवण्यात येणार आहे.