
भारत-पाकिस्तान यांच्यातल्या वाढत्या तणावात इंडियन प्रीमिअर लीग २०२५ एका आठवड्यासाठी स्थगित करावी लागली. आयपीएल २०२५ चे १६ सामने अजून शिल्लक आहेत आणि त्याबाबतचा निर्णय परिस्थितीवर अवलंबून आहे. यापूर्वीही ४ वेळा आयपीएल स्थगित करावी लागली आणि दुसरीकडे हलवली गेली होती. त्यामुळे बीसीसीआयला या परिस्थितीचा अनुभव आहे. बीसीसीआयकडे उर्वरित सामने खेळवण्यासाठी संयुक्त अरब अमिराती, श्रीलंका आदी पर्याय आहेत. त्यात इंग्लंड क्रिकेट बोर्डानेही ( ECB) मदतीची तयारी दर्शवली आहे. पण, बीसीसीआय ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी भारतातील ४ शहरांची चाचपणी करत आहेत.